Friday, 9 December 2016

दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षण मात्र आहे. ..... तू नाही आलास तरीही दुःखी करून जातोस. .... तू आलास तरीही उध्वस्त करून जातोस. ..... क्षणभर मनावर सुख तू पेरून जातोस..... बरसून मग धरतीवर पेरलेल्या सूखातही तूझं तुझ्या सवे वाहून नेतोस ...... पुन्हा मनाला दुःख तू दुःख देऊन जातोस सागंना मजला माझ्याशी तू असा का वागतोस? ...... दुःख बांधले माझ्या दावणीला अन् सुख क्षणमात्र आहे. ..... तू नव्हता म्हणून कित्येक जीव हकनाक संपलेत ....उरलेले तू आलास आणि घेऊन गेलास किती रे जिव वाहून. ...... संसार ही उघडे करून गेलास तू आलासही आणि आता दुष्काळावर मात करून गेलास कुठे कुठे तर.... नदी, नाले, शतीवाडी, वस्तीही सर्व काही घेऊन गेलास. ..... शेतकऱ्यांचा आधार तू पन जीवनात त्यांच्या अंधार करून गेलास. ..... तू आलास बरसून पुन्हा सुखावून गेलास ... तू आलास पुन्हा उध्वस्त करून गेलास. ... स्वतःबरोबरच पीकांनाही वाहून घेऊन गेलास. .... दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षणमात्र आहे. ...... क्षणभंगुर आहे.......... बळीराजाच................. ..........सुरजकूमारी गोस्वामी. .... कळंब. ..."हैदराबाद "

No comments:

Post a Comment