Monday, 26 December 2016
सुर्य चंद्र
एका आकाशाची माया
देवा तुझी कशी किमया
आकाशात दोन छाया
एक सुर्य एक चंद्र
एका गगनात दिवस रात्र
एका किरणाने पहाट जागते
सुर्य कसा अकाशी झळकतो
उपमा ना तुला सुर्या
तु जगाचा राजा आहेस
तुझी रोज पुजा
देवा तुझी निराळीच माया
सुर्यच्या येण्याने आकाश उजळते
चंद्र चा येण्याने आंधार आकाश पांघरते
सुर्य माझा सखा कसा दिवस काटतो
सावली संगे खेळ कसा खेळतो
चंद्र माझा सोबती लेकराचा मामा
कसा चांदणी संगे तो रात्र पाळजतो
तुझी किमया निराळीच देवा
सुर्य चंद्र कसे नांदते अकाशी
एक उजेड दाखवितो
एक अंधार दाटवितो
एक उजेडी पाहाट
एक अंधारी रात्र
काळोख रात्रीचा चिरून
सुर्य उमेदिचा नवा
रात्र अंधारी अशी
चंद्र चांदणी ची साथी
ही निराळीच प्रीती
चंद्र चांदणी मीलनाची
दीवस रात्रीचा खेळ
खेळती खेळ सुर्य चंद्र
दिस रात्री एक अनोखीच
आहे भेट दिस रात्री ची
ग्रहण लागते सुर्य होते
भेट सुर्य चंद्राची दिवसा अंधारून
येते होते प्रचीती रात्रीची
ग्रहण लागते चंद्रास पुनवेचा
चांद अंधारतो नभासी
खेळ दिवस रात्रीचा सुर्य
चंद्रा विणा नाही
नाही कुणी येथें अमर प्रणी
सुर्य चंद्र अमर येथें
नाही दुसरे कुणी
एक दिवसाचा हिरा
एक रात्रीचा धनी
सुर्य चंद्र विन श्रेष्ठ
येथें कुणी
देवा तुझी किमया आहे न्यारी
..............सुरजकुमारी गोस्वामी
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment