....तिंरगा
त्याग केशरी रंगात
शांतता दावीतो जगा
सफलतेचा हिरवा
लेवून झाला तिरंगा
पहा आकाशात तो
फड फड करी कसा
दिमाखदार तिरंगा
राजा गगनाचा असा
उरी बाळगून गेले
धेय्य एकच ठेऊन
लढले ते देशासाठी
घरदार विसरून
व्यर्थ नाही बलिदान
रक्त ज्यांनी सांडीयले
तिरंग्यात लपटून
शहीद ते वीर झाले
तिरंग्याचा आभिमान
तिंरगाच माझी शान
तिरंग्यात श्वास अन्
तिरंगाच झाला जान
............सुरजकुमारी गोस्वामी
हैद्राबाद
...
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment