Friday, 27 January 2017
जाती ची दरी
🔹 *दरी जातीची*
*सवर्ण अवर्णाच्या* पूर्वापार दुःखावर
मात करायला *साथ तुझी हवी आहे !*
*आपल्यातल्या जात* नावाच्या दरीला
सांधायला प्रितीचा रे *सेतू हवा आहे !*
*जातीभेदाची आडवी* पोकळी मोठी
भरल्याशीवाय *साथ ही अधूरी आहे !*
*प्रेम तुझे हे दिखाव्याचे* काय कामाचे
जातीत गुंतलेली *प्रीत अधुरीच आहे !*
*घेतल्या वचनाची आण* तूच तु जाण
साथ ही लाभताच *प्रित सुंगधी आहे !*
*फुले वाहीली* जशी देवाच्या चरणात
सर्वस्व देह माझा *अर्पण तुलाच आहे !*
*विलीन होण्यास तुझ्यात* मी रे आतूर
जातीय भिंत *भेदणे मात्र बाकी आहे !
सुरजकूमारी 💞💞
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment