Thursday, 5 January 2017

कविता

*🍁🌹🍁 ♡जीवन कविता ♡ * आईच्या मधुर सुरातुन, बाळाच्या कानात गुंजलेली….! अंगाई बाळाची माझी, आहे ही कविता पहिली…..! बाळाचे बोबडे बोबडे बोल, मनाला मोहिनी माझ्या घाली….! मूक्याचा आधार असते. कविता आपली असे चिंबओली…………! - जीवणात प्रेमाची सुरूवात कविता - प्रेमाची ओड निर्माण करते कविता…! प्रेमात पडलेल्या सुचते प्रेम कविता प्रेमाचा पाजर फोडते प्रेमकविता….! विद्रोहाचा आवाज आसते कविता प्रेमभंगातून सावरल्यावर होते विरह कविता..! कविची वेगळीच नशा असते कविता कविच्या जगण्याचा श्वास आसते कविता…! खचलेल्या माणसास जगण्याची आस आणि आधार बनते कविता…! वेदनेचा अतं असतो कवी म्हणून कवीच्या हृदयाच्या सागरातून वाहते कविता…! कविच्या नसा नसा तुन वाहत जाउन गगनाला गवसनी घालते कविता….! चंद्र तारे सुर्य् धरती आकाश पाऊस वारा ऊन यांचे वर्णन कविता…! शब्दांवर कवीचे प्रेम असते कविता कवि जळतो सरणावर आमर राहते कविता…! मनाच्या पटलावर हेलकावे घेते कविता कवीच्या जगण्याला जीवन बनवते कविता …! ..........सुरजकुमारी गोस्वामी.. हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment