Friday, 27 January 2017
नाते
.............नाते...............*
*तोडून तुटेल का,*
*जन्म जन्माचे नाते.!*
*उपवास करून ,*
*देवास विनवले होते.!!*
*सप्त पदिच्या पावलांनी,*
*तुला जीवन वाहिले होते.!*
*मंगळसूत्राच्या साथीने तुला,*
*जीवनात गुंपले होते.!!*
*तुझं साठी सजवून देह ,*
*सर्वस्व आर्पिले होते ..!*
*तुझ्या स्पर्शाने मी हि*
*बेधूंद होत होते ...!*
*सोडून माझे उनाड पण ,*
*तुझ्यासाठी जीवन जगले..!*
*तुझ्या वंशासही अंश देण्यासाठी,*
*आर्त वेंदना मी भोगले.!!*
*आयुष्य तुझे करूनही ,*
*हा कंलक मलाच का?*
*तुझ्या जीवनात माझा ,*
*असा हा अंत का?*
*सर्वस्व तुझे करूनही ,*
*तलाक नामा आला...!*
*तुला आपले मानूनही का ,*
*परके पणा केला ....!!*
*सोडून सुटेल का जन्म*
*जन्मातराचे नाते.!*
*काडून जीवनातुन तुझं*
*चैन मिळेल का?*
*माझे अस्तिव मिटवू*
*शकशील का तुझ्या मनातले.!*
*नाते आहे जन्मो जन्मीचे*
*चे सख्या रे आपले.!*
*सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment