Tuesday, 24 January 2017

जगले निवांत

जगले निवांत जीवनात मी, द्यायचे काही आता परत करायचं खूप काहीआहे, या दुनियेतुन जाताजाता ! माणसामाणसातली जात, मीटवायची आहे हुंडा प्रथा अन् बळीची, बंद करायची आहे जाताजाता भेद मूलामुलीतला स्त्रीभ्रुण हत्या कोमलत्या जीवावरचे होणारे जीवघेणे अत्याचार थांबवायचे आहेत मला जाताजाता शेतकऱ्यांच्या हातात त्या फासाची दोरी येऊच नये म्हणून योग्य हिताच्या योजनांची तरतूद करायची आहे जाताजाता मीटवायचीय गरिबी देशातील सुजलाम सुफलाम ह्या धरणीला हरितक्राती, जलयुक्त शिवारांची निर्मीती करायची आहे जाताजाता झालेल्या प्रत्येक माझ्या बलात्काराचा अमानुषपणा करणा-या प्रत्येक नराधमाच्या नरडीचा घोट घ्यायचाय मला जाताजाता ............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment