राहिले नाहीत दर्दि मानसे आता
मनात पाप ठेऊन करतात ते सत्ता आता
भावनाची किंमत शुन्यच आता
बाजार मांडला येथें मनाचा
कुणी ना सखे सोयरे सोईचे
वरूनच फक्त ते कुरवळतात आता
नाही कोणी सखा येथे आपला
जो तो स्वार्थाने बरबटला आता
निस्वार्थि प्रेम करतेना कुणी
स्वार्थसाठी झाले ते ऋषी मुनी आता
आंधळी सारीच येथे सत्ता
न्याय काय करणार न्याय देवता आता
................सुरजकुमारी
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment