Wednesday, 25 January 2017

नाते

.............नाते...............* *तोडून तुटेल का,* *जन्म जन्माचे नाते.!* *उपवास करून ,* *देवास विनवले होते.!!* *सप्त पदिच्या पावलांनी,* *तुला जीवन वाहिले होते.!* *मंगळसूत्राच्या साथीने तुला,* *जीवनात गुंपले होते.!!* *तुझं साठी सजवून देह ,* *सर्वस्व आर्पिले होते ..!* *तुझ्या स्पर्शाने मी हि* *बेधूंद होत होते ...!* *सोडून माझे उनाड पण ,* *तुझ्यासाठी जीवन जगले..!* *तुझ्या वंशासही अंश देण्यासाठी,* *आर्त वेंदना मी भोगले.!!* *आयुष्य तुझे करूनही ,* *हा कंलक मलाच का?* *तुझ्या जीवनात माझा ,* *असा हा अंत का?* *सर्वस्व तुझे करूनही ,* *तलाक नामा आला...!* *तुला आपले मानूनही का ,* *परके पणा केला ....!!* *सोडून सुटेल का जन्म* *जन्मातराचे नाते.!* *काडून जीवनातुन तुझं* *चैन मिळेल का?* *माझे अस्तिव मिटवू* *शकशील का तुझ्या मनातले.!* *नाते आहे जन्मो जन्मीचे* *चे सख्या रे आपले.!* *सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment