नाती
लाकडावर वार करावे तसे
तसे वार काळजावर झाले
ती होती आपलीच नाती पण
वैर तिथे पेरले गेले
मनात नव्हते कुठलेहि द्वेष
नाते ते दुर होत गेले
आपलीच होती सारी जत्रा
पण दुसरे तीथे माल विकुन गेले
हातात होते सारे काही पण
रेती प्रमाणे सुटत गेले
आपलीच नाती होती कमजोर
म्हणून ते पेटवून गेले
.
...................सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment