Sunday, 1 January 2017

काळीज

काळीज त्या काळजीच्या काळजाला तू मिठ्ठीत कैद कलेस का स्पंदना सैल कर मिठ्ठी जरा तू काळीज गहिवरून आले. ......! कुठे कळीला पोटात नष्ट केले बापाने पतीला पेटण्या आधिच मातीत मातीला भष्ट केले कोणी हुड्यांच्या जाचास कंटाळून स्वतःला फाशीवर बहाल केले. ....... सैल कर मिठ्ठी स्पंदना काळीज गहिवरून आले. ........! कोणी एकतर्फी प्रेमातून तिच्यावर चाकूने वार केले कोणी अॅसीड अ‍ॅट्याक करून तीचे जीवन उद्ध्वस्त केले. .. सैल कर स्पंदना मिठ्ठी काळीज गहिवरून आले .......! कोणी बलात्कार करून तीला ठार केले गुप्त अंगात भरून कचरा तीला जिवंतपणी मरण दिले वासनाधारी नराधम कुत्र्याने तीला आयुष्यातून उठवून दिले. .... काळीज भरून आले. ... या पुरूषी अहंकाराला आता ठेचायला पाहिजे. ..... आता विचार करून बाईनेही पुरूषी गर्भास पोटातच नष्ट केले पाहिजे. .... खुर्चीत बसलेल्या त्या सरकारी पिल्लांना, ईगळ्यांनी दंसायला पाहिजे न्याय द्या आम्हाला म्हणून. .... एल्गार करायला पाहिजे. ..... सोडून दिली मिठ्ठी स्पंदनाने पेटून उठले आता. ..... त्या होणाऱ्या अत्याचाराला न्याय मिळावा म्हणून पेटून उठले मी. ....... .................हे. सुरजकुमारी गोस्वामी . ..............हैदराबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment