Sunday, 15 January 2017

मुलगी

.....मुलगी आई तुझ्या मनात आज काय आहे गर्भात मुलगाच असूदे काय हा विचार आहे एकचं सांगते आई नको असा विचार करूस कल्प विकल्प असे नको मनी धरूस मुलगा की मुलगी हा फरक का करता तुम्ही का? मुलगाच वंशाचा दिवा ह्यातच गुरफटणार तुम्ही पेढे वाटता आनंदाने मुलांना झाला म्हणून गावभर त्याचे सोहळे करता नटून सजून आई खरंच का मुलगा महान असतो? मुली पेक्षा मुलाचाच का अभिमान असतो? म्हातारपणचा सहारा म्हणूनच का मुलाला पाहाता? वंशा साठी मुलगाच हवा असा हट्ट का धरता? आई मलाही जन्म घेऊ दे हे जग मलाही जरा बघु दे सोहळे माझ्या जन्माचे घाल जीलभी वाटून गावजेवण घाल मुलगा असला जरी दिवा ऊजळतो तुझ्याच दारी मुलगी असते पणती जळते ती दोन दोन घरी आई, नकोस तू काळजी करू तुमचा मीही सहारा होईन वंश परंपरेचा मान मीही असाच पुढे नेईन माझा हि तुम्हाला अभिमान असूदया माझ्या वरही तुमचा असा विश्वास असूदया आई मनातल्या मनात तु नको आता रडूस मुलगा नाही घरास नको आतल्याआत कुढूस तुझ्या ह्या रडण्याने मलाच होतात गं वेदना कळतात ग मला तुझ्या त्या संवेदना लोकांना साठी का तू दार लाऊन रडतेस बोलणारी लाख तोंडे त्यांचे काय मनावर घेतेस बोलु दे त्यांना जन्म दे मला खरं सांगते मी झाशी होईन लोकांच्या मनातुन मुलामुलीचा हा भेदच मी नष्ट करीन नाव घराचे मीच मोठे करीन हेच वचन मी तुला देते राहून तुझ्या ऊदरात हेच वचन मागते मी येऊ दे मला तुझ्या ओच्यात हेच वचन मागते मी येऊ दे मला तुझ्या ओच्यात... येऊ दे तुझ्या ओच्यात... .............सुरजकुमारी गोस्वामी ..हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment