Tuesday, 24 January 2017
नावात काय
नावात काय असते ?
..........................................................................
या फेसबुकमुळे मला ते आणखीच हास्यास्पद झाले आहे. एक जण विचारतोय तुम्ही मेल या फीमेल...? रडा आता....
लहानपणी सगळे जण पोराच नाव आहे म्हणून चिडवत.... सुरजची सुरजी झाले मैत्रिणीसाठी...!
शाळेत गेल्यावर नववीत असेन. एक मैत्रीण नवीन होती. तिने माझा नंबर सुरज या नावाने वहीत लिहिला. तो तिच्या भावाने पहिला आणि तिला सुजेपर्यंत मारले. का तर मुलाचा नंबर आहे म्हणून !
मला तिच्या घरी जावे लागले तिच्या वडिलांना, भावाला समजवायला.
कोण सुनीता, कोण सुरी, राणी, परी हे समजावले.
माझ नाव ते माझंच.
माझ्या आजीची एक मैत्रीण होती म्हणे. तिचं नाव होते सुरज्याबाई. माझ्या आजीला तिची आठवण होत होती म्हणून तिने माझे नाव सुरज ठेवले !
आता माझ्या लग्नाची वेळ . . . पाहुणे आल्यावर मी माझे नाव सुरज सांगितले आणि सगळ्यांना आश्चर्य वाटले. का,
तर चि : गौरीशंकर
कुमारी : कुमारी सुरज
आता मी सौ. सुरजकुमारी गौरीशकर गोस्वामी आहे.
आता बोला, नावात
काय असते की नाही ते ...
सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी
हैद्राबाद [कळंब]
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment