Tuesday, 24 January 2017

पहिले प्रेम

पहिले प्रेम पाहताच मी तूला रे माझी ना मी राहिले हृदयातली स्पंदने माझे अता न् राहिले.... जडल्या मनात आता तुझेच नाव रे कोरले प्रेमरंगी डुंबले ते मन माझे रे हरवले.... तूच माझा ध्यास आता तूच माझा आभास आहे तूच माझा सहवास आता तूच माझा श्वास आहे..... श्रावणातल्या सरी परी जीवनास तू व्यापीलेस ग्रिष्मातल्या ऊनातही दव बिंदू तू शिपीडलेस... कावरीबावरी अशी मी बेधूंद कशी रे झाली तूझ्या गंधाच्या नशेत मी बेहोश कशी रे झाली..... पहिल्या प्रेमात ह्या रे तल्लीन अशी मी झाले सर्वस्व तुला वाहुन रे मीरा मी, राधा मी झाले.... ..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद (कळंब ) Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment