Sunday, 8 January 2017

नव्यानं

आला आयुष्यात तो ऋतू
परत नव्याने

जुनीच होती रीत सारी
पांघरून मखमल ती आली नव्याने

प्रेमाची हि रीतच न्यारी
जुनी ती प्रीती आली नव्याने

फुले नविनच होती
ऊमलली ती नव्या दमाने

स्विकारले  ते जुने प्रेम
नव्या मनाने नव्या नात्याने

होते सारे जुनेच काही
सुरकुतले ते चेहरे आज वयाने

पण आंनदले ते जुन्यापणाने
नव्या क्षणाने  नव्या मनाने

..............सुरजकुमारी

No comments:

Post a Comment