Sunday, 1 January 2017

नाते

-----------नाते ------------- तोडून तुटेल का , जन्म जन्माचे हे नाते..! सोळा सोमवारचे हे व्रत, तुझ्यासाठी केले होते..! सप्तपदींच्या पावलांनी , तूज जिवन अर्पीले होते ..! मंगळसूत्राच्या साथीने, तूज जीवनात गुंफले होते..! तूजसाठी सजवून देह, तूला सर्वस्वी वाहीले होते..! तूझ्या त्या पहिल्या स्पर्शाने, मीही मदहोश झाले होते..! सोडून माझे उनाड पण , तूझ्या नावे आयुष्य केले...! तूझ्या वंशास अंश देण्यास, आर्त वेदना मी भोगले...! आयुष्य तुझे करूनही, हा कलंक मलाच का? तूझ्या जीवनात माझा, असा हा असह्य अंत का? सर्वस्व तुझे करूनही, तलाक नामा आला...! तूला आपले मानूनही , का परकेपणा तू केला. ...! सोडून सुटेल का, जन्म -जन्मांतराचे नाते? तूज चैन मिळेल का, काढून मज तूझ्या भविष्याते? भूलवशील का भूलवून तूही, माझे हे अस्तित्व मिटेल का ? सख्या रे जन्मो जन्मीचे हे नाते, क्षणाद्धार्त खरचं संपेल का? ..........सूरजकूमारी गोस्वामी कंळबी -हैदराबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment