Sunday, 1 January 2017
माणुस
🐜माणूस 🐜
अरे अरे माणसा असा कसा रे तू
आई- बाप ठेवून वृद्धाश्रमात
पोथी - पूराणात देव धुडकतोस तू
देव मागतो का रे केव्हा तुझ्याकडे
बक-याचा खायला कधी नैवेद्य
तूझ्या पोटासाठी तू हैवाना
करतोस त्यांचाच वध
कुठल्या पूराणात लिहिली
आहे रे तुझी जात
कुठल्या काळात तू जन्म घेतलास
जातीसाठी का माणूस माणसास कापतो
होतो कसाई जातीसाठी माणूस
देवीला पूजायला करतोस नवरात्र
करून पूजा पाठ आणि तू
भक्त स्वतःला म्हणवतोस
आणि त्याच देवीस तू मारतोस गर्भातच
असा कसा रे तू देव धर्म करणारा
कर्म कोणाचेही पोथी पुराणातून
नं करणाऱ्या ,धर्मांच्या नावाने
बोंबलणा-या तू माणसा
पुण्य - पापाचा ठेवतोस तू हिशोब
मग तू एक काम कर,
तू आयुष्यातील काही क्षण देव
धर्म विसरून अनाथासाठीही
तुझा वेळ खर्च करून दाखव माणसा...........
____________सुरजकूमारी गोस्वामी ____________हैदराबाद
मग तू एक काम कर,
तू आयुष्यातील काही क्षण देव
धर्म विसरून अनाथासाठीही
तुझा वेळ खर्च करून दाखव माणसा...........
____________सुरजकूमारी गोस्वामी ____________हैदराबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment