टाकली मी कात आता
बिन बिळाचा साप मी आता..
सांग तुझ्या नजरेत काय
किंमत माझी आता..
शरम सोडली नाही
लाजत नाही तीही आता ...
लपुन वार का तुझे
झाला वेंदनेचा अंत आता..
नीरवस्ञ केलेस तू
बलात्कार कैक झाले आता ..
सीता नाही मी
लक्ष्मणन रेषेवरून चलायला आता...
कृष्णा सारख्या भाऊही नाहीत
बहीणीस रक्षाकरायला आता ..
द्राॉपदी नाही मी राहीले मीही
घांर होऊन फिरत नाही मीआता..
साप होऊन दंश जहरीला करेल
मी आता...
,,......सुरजकुमारी गोस्वामी....हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment