Sunday, 1 January 2017

नशीब

नशीब माझे गाळला किती ही घाम तरी भोग माझ्या नशीबी... आठरा विश्व दारिद्रय माझ्या नशीबी.. होते माझ्या घामाचे मोती निढळ..... कितीही केले कष्ट तरी फळ का? मला देत नाही ईश्वर........ कुठला गुन्हा केला मी या जन्मात शेतकरी बनवून भोग भोगतोय मी.... या दारिद्रया तच आयुष्य जगतोय मी... कोणता शाप माझ्या नशीबी.. कुठल्या जन्माचे फळ.. तुझ हृदय माझ्या साठी का होते दगड .... दिन रात मेहनत करून ही राती चा दिस करुन ही माझ्या नशीबी का हा वणवा....... कुटुंबाच्या भाकरी साठी जीवन जगत मी आहे.. दीवाळीचा सन कुठं माझ्या नशीबी.. सावकारचे कर्ज काडून पोरी बाळींची बोळवन माझ्या नशीबी येते ..... होळी रोज दुःखाची माझ्या काळजात जळते....... देवा तुच साग आता कर्जाचा डोगर वाढत आहे...... आहत्मया करून तरी माझा प्रश्न हा सुटेल का? माझ्या मागे पोर बाळं तरी सुखात ठेवशील का?? दुखाचे रान सोडून सुखाचे दीस दाखवशील का? ..........सुरजकुमारी..गोस्वामी..हैद्राबाद (कळंब] Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment