Sunday, 1 January 2017
प्रेम पत्र
तुझे प्रेम पत्र माझ्या
जगण्याचा श्वास आजहि
आजही आठवणीत तो...
बेभान कोसळनारा पाऊस आजही....
पावसाचा साजहि प्रेमाला
ते दिवस बहरलेले अन
पावसाने अंग शाहारलेले
अपवाद नाही तु पन
तु आलास समोरून ........
मी तुला पाहिलेले..............
तुझी आणी माझी लागली टक्कर
तीथेच सुरू झाले प्रेमाचे चक्कर
मी तुला पाहिले अन तु मला
डोळ्यांना डोळे भिडायचे
प्रेमात तुझ्या मी झुरायचे
पाऊसात पुन्हा मी भिजायचे
देवानं घेवाण सुरू झाली
तुझ्या माझ्या पुस्तकांची
पावसाची हि न्यारी किमया
छत्री दोघांत एकच असायची
सुरवात झाली प्रेमाची
वही पुस्तकात तुझ प्रेम
लपवायचास अलवार पने
हेच मनाने जानले माझे मन
तुझ्या मनातील भाव तु
मला चोरून कळवायचा
पाऊस आपल्या प्रेमाचा दुवा
मग तो सरीतून कोसळायचा
माझ्या हृदयाचा सांगवा
मिहि त्या पत्रात मांडले
पावसाने प्रेम बहरू लागले
पावसाने प्रेम करने शिकवले
आजहि माझे प्रेम
पाऊसात फुलते
तुझी प्रेम पत्र वाचुन
नयनांत मी पाऊस भरते
,,........सुरजकुमारी गोस्वामी................
हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment