Sunday, 1 January 2017
बंधन
'.....................................................'
स्वःताच्याच पंखात मी , आज लपवते आहे स्वःताला,
बाईपणाच्या जखमाचा प्रवास गर्भातच
असतो सुरु झालेला.........!
सात पदराच्या कळीतही बाईचा जिव
सुरक्षीत नसतो,
लपन डाव माझ्या जिवनाचा आईच्या
पोटात असतो........!
आईचाश्वासही माझ्यासाठी तिळ तिळ
तुटत असतो,
बाप माझा जगासाठी,त्याला ही लक्षी
नको असते.........!
वंश वाडवण्यासाठी त्याला ही लक्षाच
हवा असतो,
पोरगीच झाली ,मनातल्या मनात तोही
कुडतो.............!
असं हीआयुष्य माझ,दुसर्या कुणासाठी
तरी असते,
किती?खडतरं हा प्रवास माझाच मला
असतो...........!
रस्त्यावर जायची भिती ,आई म्हणते
बलात्कार होतो,
बा,मला बंधनात बांधतो तेथेच श्वास
गुदमरुन जातो..........!
डोळ्यातल्या आसवांना सोडून देते मी,
मनसोक्त वाह्याला,
मरूण जिवन जगत आहे,पिंजर्यात कैद
करून स्वःताला..........!
बंधनात बांधून मला ,आज बाप माझा
रडत आहे,
लोकांसाठी तो,आज माझ्यावर बंधन
करत आहे..........!
मी ही स्वतःला पंखात बांधले,जिवन हे
नकोसे वाटूलागले,
तोडून संग उडावे वाटले,भरून बळ
पंखात उडावे वाटले..........!
मोकळा श्वास,आज इथे मलाही घ्यावा
असे वाटते,
परत मनात भिती नराची वाटते,पंखात
मी स्वःताला बांधते...........!
सुरज कुमारी.
कळंब.
(हैद्राबाद.)
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment