Sunday, 1 January 2017

शाळेत नाही जायचं

🙅🏻🙅🏻🙅🏻🙅🏻🙅🏻🙅🏻🙅🏻 नको पाठवू आई मला वस्तीगृहात शिक्षणासाठी मला नाही शिकायचं मला नाही आता शाळेत जायचं कशाला शिक्षा मला तुझ्या पासुन दूर नाही राहायचं .. नको शाळा मला शाळेत नाही जायचं.. शाळेतील संगळेच जन मला नको तेथे करतात मला स्पर्श गेटवरच्या मामा पासुन ते गाडीत तुन नेणाऱ्या काका पर्यत संगळेच वाईट वागतात काय त्या संगळ्याचा अर्थ मला कळतं नाही तु सांग ना काय असतो वेंदना होतात खुप सांगणार पन मी तिथे सांगनार कुनाला त्या आश्रम शाळेत आपले असे कुणी नसते च आई मला पुन्हा शाळेत नाही जायचं तुझ्या पासुन लांब आई मला नाही जायचं ... सांगितले कुणाला काही तर ठार करू परीवाराला म्हणून धमकी देतात संगळेच जन आई नको मलाअशा शाळेत मला नाही शिकायच... आई तुझ्या कुशित मला फक्त राहायचं ... मला नाही शाळेत जायचं असे का वागतात सगळे कळत नाही मला नाही अर्थ मुलगी म्हणून जन्माला येण का आई पाप आसत, मला नकोअशा शाळेत मला नाही जायचं ... मला नाही शिकायच.... [सत्य घटणेवरून आश्रम शाळेतील मुलगी बोलतेय ] ..............सुरजकुमारी गोस्वामी... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment