Sunday, 1 January 2017

डिजीटल

-----------------डिजीटल---------------- उचकी कुणाची आता लागत नाही, डिजीटल झाले सर्व बघां काही.! पत्र व्यवहार आता होतच गं नाही, व्हाॅटस् अॅप चा जमाना आला बाई.! आईची मम्मी झाली आता बघां बाई, आई हे अक्षर नावालाच फक्त ताई.! चूलीचे अस्तित्व आता नाही गं बाई, गॅसचा जमाना आता आला गं ताई.! देवाचे दर्शन आता देऊळात नाही, टीव्हीवर लाईव्ह आता कधीची पाही.! शेजारच्या शेजार आता दिसत नाही, कोण मेले घरात कूणाला पत्ताच नाही.! सडले मडे तर वास येतो शेजाऱ्याला, शेजारीच आता हो परदेशी झाला.! नात्यात गोडवा दिसेना हो हाली, पोरगा फिराय माय बापाला गल्ली.! पोर त्यांची पाहतात उद्या त्यांची पाळी, माणसेच झाली येथे स्वार्थीच सगळी.! -----------सुरजकूमारी गोस्वामी--------------- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment