Sunday, 1 January 2017
नवरा माझा
🐄नवरा माझा 🐄
दारू पाई मंगळसुञ
ठेवून तीचे गहाण
तरी संसार करते
नवरा माझा महान
रोज दारूडयाची मारझोड
सहते ती गुमाण..
नवरा माझा महान
गटारीत लोळतो
वेड्या सारखे करतो
शेजारच्याशी लडतो
बायकोची शीरजोरी
नवर्यास मागेकरी..
शेजारच्या नावाने बोटे
मोडी तुम्ही केले बदनाम
नवरा माझा महान
घरात भाकर ना
काकर भर वावर
तरीही जगत आहे
बारमाही करून
उपवासाची शान..
नवारा माझा महान
बाळाला दूध नाही
पिताडयाला सुध नाही
तरीही नवरा माझा महान
रोजच उधारी करतो
सावकाराशी तडजोड
करतो
बायकोचा सौदा करतो
दारू पाई जोरू विकतो
तरीही नवरा माझा महान
बायकोची झुटी शान
कुंकूच्या धन्यापाई
विकते ती ईमान..
दारूड्या नवर्याचा
तीला आभिमान...
🐾सुरजकुमारी गोस्वामी..हैद्राबाद 🐾
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment