Sunday, 1 January 2017

पणती

एक पणती झोपडीत प्रकाश उजळीते बाहेर रोषणाई सारी कशी मनास भूलवीते मन तीचे आठवणीत जाते प्रेमाचे चांदणे नव्हते फुलले मनात हातातील चूडा, हळदीचा रंग पडला नव्हता अजून फिका अंग आता कुठे स्पर्शाने मोहरतच जात होते लाजरी बावरी नवरी मनात प्रेमाचा पाझर फुटत होते केसांत गुंफला होता त्याने गजरा जाईचा सुंदर सुहासिनीचे मन होते तीचे आणि त्याचे बेधुंद दिवस दिवाळीचे रोषणाईचे पणती पाझळत होती अंगणात हर्ष मनात उल्लास अंगात मनी होती त्यांच्या प्रीत ही उसळलेली आली धन्याला बोलावणी निरोप आला सिमेवरूनी गेला निघून तो देश सेवेला ह्रदयातील तिचा पाझर ह्रदयातच तीच्या सुखावला धनी देशाचा रखवाला मनी तिच्या अभिमान उरी बाळगी जळते जशी आकाशी चांदणी जळली ती वर्षानू वर्षे सासू सासरची लेक बनली सून अशी ती एक आला सांगावा दूर देशातून शहीद झाला आहे जवान युद्धाच्या भूमीतून कसे आभाळ तिच्यावर कोसळले धरणीवर चांदणी जशी खाली पडली तीच्या गळी तुझे माझे एक दुःख रडल्या डोळ्यातून बरसले चांदणे वीराची पत्नी विरहात मरते काही दिवसांचाच थाट होता लोकांच्या नजरेत जगणे आता तिचे एका स्पर्शाच्या साथीने ऊभे आयुष्य जळाले वात होऊन पत्नीचे आज म्हातारपण छळते काही दिवसाचा प्रवास काही तासाचा सहवास ऊभे आयुष्य तिने असेच काटले तिने आठवणीने रोषणाई जगात आणि पणती जळते झोपडीत. .....!!!! ............सुरजकूमारी गोस्वामी हैदराबाद ( ) Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment